Spread the love

राजूबाबा आवळे यांच्या प्रचारार्थ हुपरी सभा

हुपरी/महानकार्य वृत्तसेवा-

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री विठ्ठल बिरदेव मंदिरासाठी दीड कोटी रुपयांचा निधी दिला.अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा कोल्हापुरात उभा केला.आम्ही विकासाचा दिलेला शब्द पूर्ण करणारे आहोत.हातकणंगले मतदारसंघात आमदार म्हणून जो येईल त्याला मदत करण्याची भूमिका राजू आवळे यांनी पार पाडली आहे. सुसंस्कृत,संयमी ,साधा ,सरळ माणूस कुठ बी आणि कोणीही हात करा थांबणारा असा सामान्य लोकांचा हा लोकप्रतिनिधी आहे.त्यांच्या विजयाचा भंडारा विठ्ठल मदिर येथूनच उधळणार आहोत.विरोधकांच्याकडे पैशाचा महापूर आहे पण राजू आवळे यांच्याकडे जनतेच्या प्रेमाचा, मतांचा महापूर येणार आहे.त्यामुळे राजू बाबा च पुन्हा आमदार होणार आहेत असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
पट्टण कोडोली येथे महा विकास आघाडीचे उमेदवार राजू आवळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली.यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी धुळगोंडा पुजारी होते.यावेळी हजारो ग्रामस्थांनी या विराट सभेस गर्दी केली होती.
आमदार सतेज पाटील म्हणाले,महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर होते तेंव्हा मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आई वडीलांप्रमाने आधार देण्याचे काम केले.त्यांचाच पक्ष फोडण्याचे काम भाजपा ने केले.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला.त्यावेळी मते गद्दाराना दिल्याची चिंता जनतेमध्ये निर्माण झाली.महाविकास आघाडी सत्याची तर महायुती असत्याची लढाई लढत आहे.जनता सत्याच्या बाजूने उभा राहणार असल्याने फसवेगिरी गद्दारी करणाऱ्या महायुतीला घरी बसावे लागणार आहे.
आमदार राजू आवळे म्हणाले,सर्वांना न्याय देत कोणताही गट तट न पहाता मतदारसंघात २५५ कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत.राहिलेली काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा विजयी करा.माझ्या विजयाची धुरा सतेज पाटील यांनी घेतली आहे.
प्रास्ताविक कृष्णात मसूरकर यांनी केले.आभार लक्ष्मण पुजारी यांनी मानले.यावेळी माजी आमदार राजीव आवळे,भगवान जाधव , साताप्पा भवान,चरणदास कांबळे यांची भाषणे झाली.
यावेळी निरीक्षक साई शैलजानाथ, के.बाबुराव,सय्यद लाविद, सर्जेराव माने, धनाजी करवते, शोभाताई शिंदे,उषाताई चौगुले,परशुराम कीर्तिकर, उमेश गुरव,सरदार सुर्यवंशी, बाळासो मोठे, शरद पुजारी, रवी आडके, अशोक मोरे, वसंत बोंगाळे, देवाशिष भोजे, खानदेव अवघडे, अभिषेक पाटील,अनिल तोडकर,आण्णासो जाधव,अनिल यादव,अंजुम मुजावर,पोपट बाणदार, अरूण माळी,देवाशिष भोजे उपस्थित होते.