Spread the love

शिरोळ/प्रतिनिधी:
गेल्या कितेक दिवसापासुन शिवसेना ठाकरे गटाचे उल्हास पाटील आणि कॉग्रेसमधुन गणपतराव पाटील यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरला होता. अखेर आज शनिवारी 26 ऑक्टोफ्लबर रोजी गणपतराव पाटील यांच्यानावार शिक्का मोर्तेाब झाला, असुन मंगळवारी 29 ऑक्टोफ्लबर धनत्रयोदशीचा मुहुर्त साधुन उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
गणपतराव आप्पासाहेब पाटील यांना कॉग्रेस पक्षाने व इंडीया आघाडीने शिरोळ विधानसभा मतदार संघातुन शनिवारी मध्यरात्री उमेदवारी जाहीर झाली आहे. गणपतराव आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांनी लोकसभा निवडणूकीत सत्यजित पाटील सरुडकर यांच्या मशाल चिन्हाचा निष्ठेने प्रचार करत, पक्ष श्रेष्ठींचा आदेश माणून कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांची मर्जी राखत केला होता. लोकसभा निवडणूकीतच विधानसभा निवडणूकीची पेरणी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केली होती. गुरूवारी कॉग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी गणपतराव पाटील हे कस निवडणू येवू शकतात. याची माहिती शिवसेनेचे पक्षप्रतोद उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जावुन स्पष्ठ केल होत. तर दुसऱ्या बाजुला आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिल्लीत राधानगरी मी सोडायल तयार आहे. पण शिरोळ पाहिजेच असा अग्रह कॉग्रेसकडे धरला होता. शुक्रवारी सकाळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी एकवेळ उत्तर घ्या. पण शिरोळ मी सोडणार नाही अशी भुमीका घेतली. शुक्रवारी दुपारी चार वाजता. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व कॉग्रेस पक्षश्रेष्टीने राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांच्याकडे, राधानगरी वांद्रापुर्व, वाद्रा पश्चिम आणि उत्तर कोल्हापुर राधानगरी, या मतदार संघाचा आढावा घेत. शिरोळमध्ये आम्ही जिंकुन येतो. आणि हि उमेदवारी पाहिजे असा अग्रह धरला आणि अखेर शुक्रवारी इंडीया आघाडीच गणतराव पाटील यांच्या नावावर शिक्का मोर्तोब झाला आणि शनिवारी गणपतराव पाटील यांच्या नावाची घोषणा, हात या चिन्हासाठी कॉग्रेस या पक्षासाठी इंडीया आघाडीची झाली.