Spread the love

शिरोळ /प्रतिनिधी
           कुरूंदवाड आगारामधील बहुतांश बसेस या खराब झाल्या होत्या. आणि शासनाच्या बस तिकिटात महिलांना दिलेल्या सुटमुळे मोठी गर्दी होत होती. प्रवाशाना कित्येक वेळ ताटकळत बसची वाट पहावी लागत होती.
            हीच बाब लक्षात घेवून उन, वारा, पावसामध्ये प्रवाशांना तात्काळ बस मिळावी आणि सुस्थितीत असावी. कित्येक वेळा प्रवास करत असताना बंद पडलेल्या बस पाहून आणि प्रवाशांचे झालेले नुकसान पाहून मला वेदना होत होत्या. म्हणूनच मी अखिल भारतीय युवक काँग्रेस संघटनेच्यावतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना काँग्रेसचे नेते नितीन बागे, राजू सनदी, हुसेन जमादार, अझहर तहसिलदार, दगडू माने, संदीप माने, निलेश पवार आदींच्या सह्यांचे निवेदन 4 जुलै 2024 रोजी दिले होते. उपजिल्हाधिकार्‍यांनी याची घेतलेली दखल आणि कुरूंदवाड आगारास मिळालेल्या गाड्यांमुळे मला समाधान वाटले. पण याबरोबरच शिरोळ येथील केपीटी, छत्रपती शाहू इंडस्ट्री, ल. क. अकिवाटे औद्योगित वसाहत आणि जयसिंगपूरमध्ये शिक्षणासाठी, नोकरीसाठी अनेक महिला, युवक एसटीच्या प्रवासाने जात असतात. यामुळे या मार्गावर पुण्याच्या धर्तीवर इलेक्ट्रिक बसेस, ए.सी. कंडीशनर मिळाव्यात अशी इच्छा त्यांनी महान कार्यशी बोलताना त्यांनी केली.