Spread the love

शिरोळ/प्रतिनिधी
        महापुरामध्ये नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना 270 रूपये नुकसान भरपाई देवून शेतकर्‍यांची चेष्टा केली आहे काय असा सवाल विचारत बाधित झालेल्या सर्व क्षेत्रावरील पिकांची सरसकट 100 टक्के पिकविमा द्यावा अशा मागणीचं निवेदन शिरोळ तहसिलदारांना देण्यात आले.
         शिरोळ तालुक्यामध्ये 2024 मध्ये आलेल्या महापुरामुळे शेतीतील पिकाचे प्रचंड मोठे नुकसान झालं आहे. कृषी खात्याकडून त्याचे पंचनामे झाले आहेत. मात्र शासनाने शेतकर्‍यांच्या भोगवटदार वर्ग 1, वर्ग 2 असं वेगळं न करता इतर अधिकारमध्ये शेरे असलेले वर्ग 2, वर्ग 3 देवस्थान, सहकार हक्क या जमिनींचीसुध्दा नुकसान भरपाई तात्काळ जमा करावी तसेच पिकविमा ज्या शेतकर्‍यांचा आहे अशा बाधित झालेल्या शेतकर्‍यांना सरसकट 100 टक्के पिकविमा द्यावा अशा मागणीचे निवेदन तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आले. यावेळी दिपक पाटील, मारूती कोरवी, संपत मोडके, महेश जाधव यासह पदाधिकारी उपस्थित होते.