Spread the love

इचलकरंजी/ प्रतिनिधी:

आमचा कोणालाही विरोध नाही फक्त छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा संभाजी चौकातच बसावा अशीच आमची अतंकरणापासुन इच्छा आहे. यामागणीसाठी आज चैंडेश्वरी मठ ,दातार मळा येथे मोठी बैठक पार पडली.

शहरात छत्रपती संभाजी चौक असताना, राजकिय नेत्यांनी राजकीय इर्षेपोटी के.एल.मलाबादे चौकातच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बांधण्याचा हट्टास केला आहे, तो सोडून द्यावा. आमचा तुम्हाला कोणताही विरोध नाही. पण गेली 40 वर्ष झाले छत्रपती संभाजी चौक शहरात अस्तिवात आहे. गेल्या 20 वर्षापासुन छत्रपती संभाजी महाराज चौकात पुतळा बसावा अशी लेखी मागणी होत आहे. शिवाय संग्राम चौक,हत्ती चौक,कागवाडे मळा,ढोर वेस,लिंबू चौक, संत मळा,आवाडे नगर,लंगोटे मळा,दातार मळा, बरगे मळा,जुना चंदुर रोड,तांबे मळा ,बाळ नगर, श्री राम नगर ,कला नगर याभागाची ओळख वाढण्यास मदत होणार आहे. याचमुळे छत्रपती संभाजी चौकातच संभाजी महाराजांचा पुतळा बसवायचा असा एकमुखी निर्णय घेवून शपथ घेण्यात आली. यावेळी महाजन गुरूजी, राष्ट्रगीतचे संपादक अजय जाधव,संतोष सावंत, संतोष शेळके,आनंदा मकोटे,अमृतमामा भासले, निखल जमाले आदींनी मागदर्शन केले. यावेळी छत्रपती संभाजी चौक परिसरातील सर्व शिवशंभु भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.