Spread the love

सांस्कृतिक उपक्रमातून आरोग्य संपदेचा विचार रुजवावा : गणपतराव पाटील

शिरोळ : प्रतिनिधी

कविज अकॅडमी च्या प्रमुख कविता माने यांच्या पुढाकारातून योगा तसेच गरबा , दांडिया चे प्रशिक्षण देऊन महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे. कलाकारांनी विविध कला क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे. नवोदित कलाकारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळावे, कलेचे संवर्धन व्हावे यासाठी कला संस्थाची सुरू असलेली धडपड कौतुकास्पद आहे. लोकप्रबोधनासाठी कला हे प्रभावी माध्यम असून सांस्कृतिक उपक्रमातून कलेचे संवर्धन व आरोग्य संपदेचा

विचार रुजवला पाहिजे. असे मत दत्त साखर कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील (दादा ) यांनी व्यक्त केले

       येथील दत्त साखर कारखान्याच्या कै दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या सभागृहात कविज डान्स अकॅडमी व कलाविश्व रंगभूमी (शिरोळ ) यांच्या वतीने दोन दिवशीय गरबा व दांडिया महिला कार्यशाळेस प्रारंभ झाला. या  कार्यशाळेचे उद्घाटन गणपतराव पाटील (दादा ) यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते. कविज अकॅडमीच्या प्रमुख कविता माने यांनी स्वागत करून संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.

         यावेळी दत्त साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील, कलाविश्व रंगभूमी संस्थेचे प्रमुख डॉ दगडू माने , इंजिनिअर डॉ विजयराज कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शुभांगी फल्ले ,जोत्सना यादव , योगिता  घुले , डॉ शुभदा फल्ले ,दिलीप पाटील – कोथळीकर   यांच्यासह कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंजिनियर रणजित माने यांनी आभार मानले.