कोल्हापुर जिल्ह्यातील 76 बंधारे अध्यापही पाण्याखाली असुन, कोयना धरणातुन 42 हजार 100, वारणा धरणातुन 11 हजार 585 तर राधानगरी धरणात्ूान 5 हजार 784 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
अलमट्टी धरणातुन 3 लाख 50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 5,6 व 7 खुले आहेत. तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. इचलकरंजी 70.11 फूट, त्ोरवाड 66.6 फूट, शिरोळ 65.2 फूट, नृसिंहवाडी 64.4 फूट, राजापूर 53 फूट तर नजीकच्या सांगली 40.6 फूट व अंकली 45.7 फूट अशी आहे.
जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 55.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर हातकणंगले- 12.8 मिमी, शिरोळ -10.5 मिमी, पन्हाळा- 28.4 मिमी, शाहुवाडी- 33.5 मिमी, राधानगरी- 18.4 मिमी, गगनबावडा- 55.8 मिमी, करवीर- 14.8 मिमी, कागल- 13.9 मिमी, गडहिंग्लज- 11.2 मिमी, भुदरगड- 32.4 मिमी, आजरा- 23.7 मिमी, चंदगड- 37.6 मिमी असा एकूण 21.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.