कोयना धरणातून 32 हजार 100 क्युसेक्स, वारणा धरणातून 15 हजार 785 क्युसेक्स तर अलमट्टी धरणातून 2 लाख 75 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. शिरोळ 59.6 फूट (इशारा पातळी 74 फुट धोका पातळी 78 फुट ), नृसिंहवाडी 59 फूट, राजापूर 47.10 फूट, राजाराम 44.6 फूट, सुर्वे 42.7 फूट, रुई 71.8 फूट, इचलकरंजी 68.6 फूट, तेरवाड 62.6 फूट, तर नजीकच्या सांगली 36.6 फूट (इशारा पातळी 40 फुट धोका पातळी 45 फुट) व अंकली 39.3 फूट अशी आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण 67 मिमी पाऊस झाला असून काल दिवसभरात शाहुवाडी तालुक्यात सर्वाधिक 123.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 71.6 मिमी, शिरोळ -44 मिमी, पन्हाळा- 91.9 मिमी, शाहुवाडी- 123.8 मिमी, राधानगरी- 94.4 मिमी, गगनबावडा- 39.5 मिमी, करवीर- 67.7 मिमी, कागल- 41.7 मिमी, गडहिंग्लज- 49.6 मिमी, भुदरगड- 65.2 मिमी, आजरा- 68.8 मिमी, चंदगड- 32.7 मिमी असा एकूण 67 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.