सांगली, दि. 4 : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे कोयना धरणातून 52 हजार 100 क्युसेक्स, वारणा धरणातून 11 हजार 570 क्युसेक्स तर अलमट्टी धरणातून 2 लाख 50 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 86.48 (105.25), धोम 11.23 (13.50), कन्हेर 8.10 (10.10), वारणा 29.28 (34.40), दूधगंगा 22.30 (25.40), राधानगरी 8.22 (8.36), तुळशी 3.30 (3.47), कासारी 2.40 (2.77), पाटगांव 3.72 (3.72), धोम बलकवडी 3.44 (4.08), उरमोडी 8.25 (9.97), तारळी 5.10 (5.85), अलमट्टी 73.63 (123).
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी (आज सकाळी 8 वाजेपर्यंत) व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 40 (40) व अंकली पूल हरिपूर 44.11 (45.11).
जिल्ह्यात शनिवारी सरासरी 3.3 मि.मी. पावसाची नोंद
सांगली, दि. 4, जिल्ह्यात शनिवार, दि. 3 ऑगस्ट रोजी सरासरी 3.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 18.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दिनांक 3 ऑगस्ट रोजी पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 1.2 (453.7), जत 0.2 (275.7), खानापूर-विटा 2.7 (368.5), वाळवा-इस्लामपूर 3.5 (735.2), तासगाव 2.1 (451.1), शिराळा 18.7 (1198.4), आटपाडी 0.2 (259.1), कवठेमहांकाळ 1.3 (390.8), पलूस 2.6 (509.4), कडेगाव 1.6 (495.9).