Spread the love

नागाव (प्रतिनिधी) : विद्याधर कांबळे

आज दि 7 मे 2024 रोजी हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये मतदान पार पडत आई. प्रामुख्याने या मतदार संघामध्ये चौरंगी लढत होत आहे. शिवसेना-भाजपा युतीकडून धैर्यशील माने,महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील(आबा)स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी,वंचित बहुजन आघाडी कडून डी. सी.पाटील यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे.शिरोली जिल्हापरिषद मतदार संघांतर्गत शिरोली येथे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सेल्फी पॉईंट उभारणात आला होता.तसेच ज्येष्ठ नागरिकांना जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त सन्मानपत्र देण्यात आले.त्याचबरोबर नागाव येथे ज्येष्ठ, दिव्यांग नागरिकांसाठी रॅम्प तयार करण्यात आला आहे.उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे नागरिकांनी सकाळ पासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती.त्यामुळे शिरोली, नागाव,मौजे वडगाव येथील मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्वच गटांचे मतदान केंद्रावर बूथ उभारण्यात आले होते.मतदारांना आणण्यासाठी वाहनाची सोय करण्यात आली होती.दुपारपर्यंत 12 वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रावर 40 ते 50 टक्के मतदान पार पडले आहे.एकंदरीत दुपारपर्यंत सर्वत्र कोणताही वाद न होता खेळीमेळीत मतदान पार पडले.संध्याकाळपर्यंत किती टक्के मेदन होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.