Spread the love

पेठवडगाव / महान कार्य
मी पेठवडगाव आणि हातकणंगलेच्या जनतेला खात्री पुर्वक सांगतो, रात्रीचे 9 वाजले आहेत. आज रविवार आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना 1 लाख मताचे लिड केवळ शाहुवाडी, पन्हाळा विधानसभा मतदार संघातुन मिळेल. वाळावा शिराळ्याची चिंताच करू नका. कुणाला गल्ली बोळात फिरायचे आहे, त्याला फिरू द्या. आपला उमेदवार पाटील आहे. हे लक्षात ठेवून मतदान करा आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्याला पराभुत करा अस खुल अवाहन कॉग्रेसचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी पेठवडगाव येथील सभेत केल. या सभेने गर्दीचा उचांक मोडला.
सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, सत्यजित पाटील सरूडकरयांच्या सारखा एक प्रमाणिक होतकरू उमेदवार उद्धव ठाकरे यांनी मशाल चिन्हावर दिला आहे. सरूडकरांची उमेदवारी जाहीर झाली आणि मतदार संघातील वातावरण बदलले. आज या मतदार संघात मशाल या चिन्हाच्या बाजुने वातावरण आहे. हातकणंगले मतदार संघातील जनतेची आता जबाबदारी आहे. त्यांना निवडूण आणण्याची. शाहुवाडी पन्हाळा तालुक्यात जर अडीच लाख मतदान झाले, तर दोन लाख मते सत्यजित पाटील सरूडकरांच्या मशालीला पडतील. आणि तेथुन वाळवा ,शिराळा आणि शाहुवाडी पन्हाळा असे अडीच लाखच लिड घेवून सरूडकर पाटील हातकणंगले तालुक्यात पोहचतील . आता आपली शिरोळ आणि इचलकरंजीनेही लिड वाढवण्याची भुमिका घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात सामान्य माणसाला त्यांनी आधार दिला. जी मंडळी ठाकरेंच्या वर बोलतात तुम्ही काय होता आणि काय झाला. आज उद्धव ठाकरे आणि शिवसेना नसती तर तुम्हाला बोलता तरी आले असते का ? शिवसेनेन तुम्हाला मोठ केल. उद्धव ठाकरेंची प्रकृती बरी नसताना तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेब ठाकरे ,उद्धव ठाकरे यांनी ज्यांना मोठ केल. त्याच लोकांनी त्यांना आजारी असताना पाठीत खंजीर खुपसल. आज समाज विश्वासावर चालला आहे. आणि विश्वासाला तडा देण्याच काम त्यांनी केल. मागच्यावेळी भर पावसात विद्यमान खासदारासाठी पाऊसात सभा घेतली होती. ते त्यांनी विसरले. ज्या लोकांना तळहाताच्या फोडा प्रमाणे जपल, आज तीच माणसे वेगळ बोलत आहेत. तुम्हा सर्वांना विनंती आहे. आपण दक्ष राहिल पाहिजे. कोल्हापुर जिल्हा हा तुमचा आमचा बालेकिल्ला आहे. बाहेरून येवून कोणाची दादागिरी चालणार नाही. जे कोल्हापुरात बस्थान घेवून आले आहेत. त्यांना बस्थान गुंडाळून पाठवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. हि भुमी छत्रपती शिवाजी महाराजांची , शाहु महारांजाची, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आहे. कोण बाहेरून येवून आम्ही कसे मतदान करावे हे सांगावे आणि आम्ही ऐकावे एवढे आम्ही दुधखुळे नाही. तालमीत तयार
झालेल कोल्हापुर आहे. कुस्ती कशी लढाईची अणि पुढच्याची पाठ मातीला कशी लावायची हे जाणणारं
कोल्हापुर आहे , आपला उमेदवार पाटील आहे. त्याच्या पाठीशी तुम्ही उभे रहा आणि तुम्ही दाखवून द्या. एक सामान्य माणूस खासदार होवू शकतो. ज्यांनी
बाळासाहेबांचा , शरद पवारांचा पक्ष फोडला. त्यांना जागा दाखवायची हि वेळ आहे.
वडगावच्या ऐतिहसिक भागात आज सभा होतेय. मी वडगाववर प्रेम केल आहे. विजयसाहेब यादव असतील , विद्याताई पोळ असतील हे सर्व मंडळी वडगावला पुढे घेवून जात आहेत. माझ्या काळात 37 कोटी रूपयाचा निधी मी येथे दिला होता.
हातकणंगले मतदार संघात ऐतिहासिक विजय मिळवायचा आहे. कोल्हापुरचे दोन्ही खासदार निवडून येणार आहेत असे ते म्हाणाले . यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, आमदार राजीव बाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार सुजित मिनचेकर,माजी आमदार उल्हास पाटील, राज्य संघटक चंगेजखान पठाण, माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ, सुकुमार कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय चौगुले, संदिप पाटील, व प्रचंड संख्येने शिवसैनिक आणि नागरीक उपस्थित होते. यासभेत अदित्य ठाकरे यांची तोफ दणाणली.
हातकणगंलेच्या गद्दार खासदारला पराभुत करा असे युवा नेते अदित्य ठाकरे म्हणाले.