Spread the love


कोल्हापूर महानकार्य वृत्तसेवा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय तीडा आणि गुंता सोडण्यासाठी रविवारी भाग घेतला. आमदार प्रकाश आवाडे यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आवडे यांच्याशी संवाद साधला. मध्यरात्री पुन्हा एकदा संवाद झाला आणि राजकीय गुंता सोडण्यासाठी मदत झाली. खासदार धैर्यशील माने यांना यानिमित्ताने सोमवारी मुख्यमंत्री ना. शिंदे, आवाडे यांच्या भेटी नंतर एक मोठा दिलासा प्राप्त झाला आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे निवडणूक लढवणार अशी घोषणा ताराराणी आघाडीच्या वतीने युवा नेते राहुल आवाडे यांनी केली होती, याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण भलतच तापलं होतं, आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्याही सुरू होत्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोल्हापुरातील एका हॉटेलच्या खलबत्त खाण्यात आमदार प्रकाश आवाडे, युवा नेते राहुल आवाडे, महिला नेत्या मौशमी आवाडे यांच्या दरम्यान 48 मिनिटे चर्चा झाली होती. मात्र या चर्चेत मार्ग निघाला नाही आवाडे यांनी निवडणूक लढणार अशीच भूमिका घेतली होती. रविवारी सकाळी ताराराणी आघाडीच्या कार्यालयात इचलकरंजीतून पुन्हा आवाडे यांनी निवडणूक लढवणार अशी ठाम भुमिका असल्याचे मत मांडलं होतं, दरम्यान दुपारनंतर आवाडे यांच्याशी राज्यस्तरावरील नेत्यांनी संपर्क साधायला सुरुवात केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा संवाद झाला. दिर्घकाळ संवादा नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद झाला आणि सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी पुन्हा त्यांच्याशी संवाद साधला. राजकीय घडामोडीवर चर्चा झाली आणि याचा परिणाम खासदार धैर्यशील माने यांना दिलासा प्राप्त झाला. आता आवाडे माने यांच्या प्रचारात असणार आहेत. आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे हे तीन आमदार भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्यासोबत याही निवडणुकीत राहणार आहेत. हे जवळपास चित्र सोमवारी सकाळी ११ :४५ नंतर स्पष्ट झालं. हातकणंगले मतदार संघासाठीचा मुख्यमंत्र्यांच्या 18 तासाचा दौरा त्या नंतरचे भ्रमणध्वनी, कोरे यांच्या निवासस्थानांच्या भेटी, आवडेंशी साधलेला, वारंवार संवाद याचंच फलित तीन आमदार एक संघ राहण्यास मदत झाल्याची चर्चा आहे. सोमवारी मुख्यमंत्री ना शिंदे आ प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी पोहोचले येथे पुन्हा चर्चा झाली आणि राजकीय भूमिका स्पष्ट झाली यावेळी युवा नेते राहुल आवाडे सौ मोशमी आवाडे यांना यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेते रामदास भाई कदम मंत्री शंभूराजे देसाई आमदार विनय कोरे यांनी आवडीनिवासस्थानी 12 वाजून आठ मिनिटांनी चर्चला आरंभ केला यशस्वी झाली