Spread the love

कोल्हापूर /महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने महायुतीचे उमेदवार आहेत यामध्ये कोणताही बदल नाही. अशी स्पष्टोक्ती हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांची उमेदवारी बदलणार याबाबत चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षनिरीक्षक पाटील यांनी आज आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
पाटील म्हणाले, या मतदारसंघाचा पक्ष निरीक्षक म्हणून काम करत असताना धैर्यशील माने यांनी अनेक विकास कामे केले असल्याचे निदर्शनात आले आहे. महायुतीतील काही नेत्यांनी याबाबत संभ्रम अवस्था निर्माण केली होती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याप्रमाणे या मतदार संघात धैर्यशील माने हेच उमेदवार आहेत यामध्ये कोणतीही शंका नाही.असं त्यांनी सांगितलं आणि उमेदवारी ही जाहीर केलं असल्याचे स्पष्ट केले.

भाजपच्या पदाधिकारी यांची भेट
या मतदारसंघात भाजपचा गट नाराज होता अशी चर्चा होती मात्र काल बैठकीत त्यांची नाराजी दूर झाली आहे. धीरशील माने यांच्या विजयात जे शिलेदार असतील त्यांचा योग्य सन्मान केला जाणार आहे त्यामुळे सर्वजण कामाला लागले असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांचे नाव घराघरात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीमहिलांच्यासाठी 50% एसटी ते मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.महायुतीच्या सरकारने लोकांच्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत हेच काम घेऊन मतदार संघात जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.