निपाणी / महान कार्य वृत्त सेवा
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व निपाणी विधानसभा मतदार संघाचे मुख्य नेते उत्तम रावसाहेब पाटील हे येत्या आठवड्यात भा.ज.पात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. हे वृत्त खात्रीलायक सुत्राकडून प्राप्त झाल आहे.
चिक्कोडी लोकसभा मतदार संघात भाजपाची शिट धोक्यात आहे. त्यामुळे भाजपाने मोठी पाऊले उचलली परिणामी आण्णासाहेब जोल्ले यांच प्रचारातील पारड जड होत चालल आहे.
कणेरी मठावर महाराजांच्या दिव्य सानिध्यात आमदार शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले आणि युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील – बोरगावर यांची एक बैठक चंद्रप्रकाशात पार पडली. या बैठकीत राजकारण बरज शिजल. त्यामुळे कदाचित उत्तम रावसाहेब पाटील बोरगावकर भाजपात प्रवेश करतील असे संकेत शुक्रवारी प्राप्त झाले. कणेरी मठावरून गेले तिन दिवस या राजकीय घडामोठी घडवण्याचा प्रयत्त सुरू आहे. या नव्या राजकारणाचा परिणाम भाजपाला चिक्कोडी लोकसभा मतदार संघात फायदेशीर ठरणार आहे. तर सदलगा चिक्कोडी लोकसभा मतदार संघात उत्तम पाटील यांना भाजपाचे पाठबळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नव्या राजकीय फेर जुळणींचा चर्चा कॉग्रेसमध्ये चिंता निर्माण करण्याची आहे. सौ व श्री जोल्ले यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, संवाद झाला नाही. तर युवा नेते साखर कारखानदार अरिहंत साखर कारखान्याचे प्रमुख उत्तम पाटील नॉट रिचेअबल आहेत.