Spread the love


शिरोळ/प्रतिनिधी
आपण पाहिल आहे, कॉग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर भाजपाच्या सत्तेच्या लालसापोटी कशी वागणूक दिली. कशा पद्धतीने पक्ष फोडला, चिन्ह काढून घेतली. यामुळे येणाऱ्या संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजे मला विजयी केल पाहिजे असे अवाहन हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांनी शिरोळ येथील आयोजीत पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात केले.
कार्यक्रमाच्या आरंभी मान्यवरांच्या हस्ते फोटो पुजन व मशाल प्रज्वल करण्यात आले. स्वागत व प्रस्ताविक महादेवराव धनवडे यांनी केले. यावेळी बोलताना कॉग्रेसचे तालुकाअध्यक्ष सर्जेराव शिंदे म्हणाले येत्या 11 तारखेला जयसिंगपूर येथील मर्चंट हॉल मध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आल आहे. यावेळी आपले नेते सत्ोज उर्फ बंटी पाटील आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते जयंत पाटील साहेब येणार आहेत. तरी कार्यकर्त्यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी आता पासुन कामाला लागावे असे अवाहन केले. तर जयसिंगपूर येथील मराठा समाजाचे नेते चंद्रकांत जाधव घणूकीकर यांनी लोकशाही मजबुत राहण्यासाठी आम्ही पाठींबा दिल्याचे घोषीत केले. यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते बी.जी माने, तालुका अद्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, माजी नगरसेवक पराग पाटील, वैभव उगळे, तातोबा पाटील, नितीन बागे, धनाजी पाटील नरदेकर, आदीसह पदाधिकारी, कार्यकर्त्ो, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्ो.