Spread the love

हातकणंगलेच्या उमेदवाराची घोषणा लवकरच – दुधवडकर
हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवाराची घोषणा आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आता लवकरच करतील आणि त्यांचा आदेश आल्या नंतर तात्काळ प्रचाराला आरंभही होईल लोकांनी ठरवलय हातकणंगले लोकसभा मतदार संघातील मशाल चिन्हावरील उमेदवाराला विजयी करायच. राहुल आवाडे यांचा उमेदवारीसाठी मागणी किंवा प्रस्ताव आलेला नाही अशी माहिती शिवसेना ठाकरे पक्षाचे लढाऊ नेते संपर्क प्रमुख अरूण भाई दुधवडकर यांनी दिली आहे.