प्रवीण पवार इचलकरंजी
हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताराराणी आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक सायंकाळी कोल्हापुर येथे बोलावली असल्याचे खात्रीशीर वृत्त असून बैठकीनंतर आमदार आवाडे मोठा निर्णय घेणार असल्याचे समजते आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला गेल्या पाच वर्षापासून बाहेरून पाठिंबा दिला आहे. परंतु अद्यापही त्यांना भाजपमध्ये समाविष्ट करून घेतले नसल्याबद्दल आवाडे पितापुत्रांमध्ये नाराजीचा सूर आहे. गेले दोन महिने लोकसभा निवडणूक लढवणे बाबत ची इच्छा आवाडे पिता पुत्रानी भाजपच्या श्रेष्ठीकडे केली होती परंतु त्यांना हातकणंगले लोकसभा उमेदवारी बाबत कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने आवडे पिता-पुत्र हे भाजपावर नाराज असल्याचे दिसत आहेत.या नाराजीतून त्यांनी ताराराणीच्या कार्यकर्त्याची बैठक बोलावली आहे. बैठकीनंतर आमदार प्रकाश आवाडे हे मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात असून, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता बळावली आहे. आता राहुल आवाडे हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की इतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत आवाडे समर्थकांमध्ये उत्सुकता लागली आहे.