Spread the love


कोल्हापूर:
महायुतीने डॉ. राहुल आवाडे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. आज संध्याकाळी कोल्हापूरमध्ये तारा राणी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन अधिकृत घोषणा करणार आहेत. दरम्यान या घडामोडी सुरू असताना त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुंबईत भेट घेतल्याची कळते. कदाचित त्यामुळेच ठाकरे यांनी हातकणंगले मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केलेली नाही. तर दुसऱ्या बाजूला या लोकसभा मतदारसंघातील कारखानदारांनी आपला प्रतिनिधी लोकसभेत गेला पाहिजे अशी भूमिका मांडल्याची समजते या संदर्भात ४ दिवसापूर्वी सांगली जिल्ह्यातील एका बड्या नेत्यासमवेत कारखानदारांची बैठक झाल्याची कळते. त्यामुळे कदाचित राहुल आवाडे कारखानदारांचे उमेदवार म्हणून पुढे येतील आणि त्यांना महाविकास आघाडीतून अधिकृत उमेदवारी दिली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ठाकरे सेनेकडून डॉ. सुजित मिणचेकर किंवा सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती. डॉ. मिणचेकर यांचे नाव जवळपास निश्चित होते. परंतु महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच काय तो निर्णय घ्यायचा असे उद्धव ठाकरे यांनी ठरवले होते. आता राहुल आवडे यांना महायुतीचे दार बंद झाल्यामुळे त्यांना महाविकास आघाडीत घेऊन ताकदीचा उमेदवार द्यायचा हा विचार पुढे आलेला आहे.