Spread the love

इचलकरंजी / प्रवीण पवार

हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी मतदार संघातील विविध नेत्यांची भेट घेण्याचा धडाका सुरू आहे. आज इचलकरंजीतील आवाडे विरोधक व मँचेस्टर आघाडीचे अध्यक्ष सागर चाळके यांची भेट घेऊन मला लोकसभा निवडणुकीमध्ये मदत करण्याची विनंती माजी खासदार राजू शेट्टी यांनी सागर चाळके यांच्याकडे केली मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके यांनी गत विधानसभा निवडणुकीमध्ये आवाडे यांच्या विजयासाठी जंग जंग पछाडले होते व प्रकाश आवाडे यांना विजयी करण्यामध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी आज चाळके यांची भेट घेतली व लोकसभा निवडणुकीमध्ये मदत करण्याची विनंती केली मात्र सागर चाळके यांनी अद्याप महाविकास आघाडी कडून आपल्या उमेदवारीबाबत कोणतीही सूचना अथवा आदेश आला नसल्याने सध्या तरी मी आपणास कोणतीही मदत करू शकत नाही त्याचप्रमाणे स्थानिक महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीने आदेश दिल्यास सर्वतोपरी मदत करण्यात मी तयार असल्याचेही चाळके यांनी शेट्टी ना सांगितले