Spread the love



सरूड / महान कार्य वृत्तसेवा
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आदेश दिला, अग्रह केला तर तुमच्या पाठबळावर जनतेच्या अर्शिवादाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातुन मशाल चिन्हावर निवडणूक लढवेण अस मत शाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार लढाऊ नेते सत्यजित पाटील सरूडकर यांनी रविवारी दुपारनंतर सरूड येते, विभागातील कार्यकर्त्यांच्या बैठकित व्यक्त केल.
पाटील सरूडकर म्हणाले, सध्या देशातील चित्र राज्यातील राजकीय परिस्थिती पहाता, मी कार्यकर्ते आणि नागरिकींना विनंती करेन, आपण आमचे नेते उद्धव ठाकरे साहेबांना मुबंईत जावून भेटून त्रास देवू नका, अशा परिस्थितीत आपण सर्वांनी ते जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी ठाम रहायच आणि निष्ठेने दाखवून द्यायच या राज्यातील आणि विभागातील आपली जनता ठाकरेंच्या सोबत आहे. पण त्यांनीच निर्णय घेतला आग्रह केला आपल्याला आदेश दिला तर बाकी आपण मी तुम्हाला शब्द देतो, हातणकंणगले मतदार संघाची निवडणूक लढवेन असे ते म्हणाले. आपल्या पक्षाच्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरूणभाई दुधवडकर संघटक चंगेजखान पठाण व अन्य नेते विभागातुन मशाल चिन्ह विजयी व्हाव यासाठी प्रयत्नशील आहेत. या मतदार संघातील जिल्हा प्रमुख आणि सगळेच शिवसैनिक आदेश माणून काम करणार आहेत. मी त्यापैकीच आहे. दरम्यान हि बैठक कार्यकर्ते यांनी आयोजित केली होती. नेतृत्वाला भेटण्यासाठी नियोजन करण्याकरीता.
दरम्यान सत्यजित पाटील सरूडकर यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी यासाठी राज्यसंघटक चंगेजखान पठाण, मधुकर पाटील, सात्तापा भवान व अन्य प्रमुख गेले दोन महिने प्रयत्नशील आहेत, अशी चर्चा सरूड परिसरात होती.