Spread the love

स्थिर पथक,व्हि.डी.ओ निरीक्षण,भरारी पथके तालुक्यात कार्यरत

शिरोळ / प्रतिनिधी – महेश पवार

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर शिरोळ तालुक्यात आचारसंहितेच्या कडक आबंलबजावणीला सुरवात झाली आहे. सोशल मिडीयावरही प्रशासनाची करडी नजर असणार आहे.

  • मोठी रक्कम घेवून चाललाय सावधान…….
  • निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर सरकारी यंत्रना लागली कामाला

शिरोळ तालुक्यात अंकली पुल, गणेशवाडी, शिवनाकवाडी, पाचवा मैल, अर्जुनवाड पुल, येथे सकाळ, दुपार आणि रात्री एकुण 15 स्थिर पथके तैनात असणार आहेत. शिवाय जयसिंगपूर, नांदणी,शिरोळ,नृसिंहवाडी,शिरढोण, कुरंदवाड दत्तवाड याठिकाणी व्हिडीओ निरक्षण पथके तैनात असणार आहेत याबरोबरच चोख निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी 6 भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत अशी माहिती शिरोळचे तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांनी दिले तहसिल कार्यालयात अयोजित पत्रकार बैठकीमध्ये दिली यावेळी शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड, गटविकास अधिकारी शंकर कवितके, शिरोळचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.