जयसिंगपूर :शिरोळ टीचर्स प्रिमीयर लीग२०२४ सहाव्या पर्वातील तीन दिवसीय क्रिकेटच्या आनंद सोहळा शुक्रवार दि.८ ते१० मार्च २०२४ अखेर राजर्षी शाहू महाराज स्टेडियम जयसिंगपूर येथे संपन्न झाली.रविकुमार पाटील यांच्या आर.पी.चॅलेंजर्स संघ विजेता ठरला तर संतोष ठोमके यांच्या मामाज रायडर्स उपविजेता ठरला.नवीद पटेल यांचा शेर ए नवीद तिसऱ्या क्रमांकावर, शकील पिरजादे यांचा एस.पी. वॉरीयर्स चौथा क्रमांक तर सुनिल एडके यांचा वारणा टायगर्सला पाचवा कमांकावर समाधान मानावे लागले. कोल्हापूर व सांगली जिल्हयातील प्रमुख मान्यवर शिक्षक नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. खेळाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी मोठया प्रमाणात दर्शकांनी उपस्थिती लावली होती.
या वर्षी शकिल पिरजादे यांचा एस.पी. वॉरियर्स, रविकुमार पाटील यांचा आर.पी. चॅलेंजर्स,नवीद पटेल यांचा शेर ए नविद, सुनिल एडके यांचा वारणा टायगर्स तर संतोष ठोमके यांचा मामा’ज रायडर्स या पाच संघांमध्ये साखळी पध्दतीने सामने खेळले गेले.पंचेचाळीस वर्षावरील खेळाडूसाठी एव्हरग्रीन ए.बी.सी.असे तीन संघ निवडण्यात आले होते. वयोमान विसरून उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले.विशेषतः सेवानिवृत्तीसाठी अवघी दोन महिने सेवा राहिलेल्या शिवाजी चन्नाप्पा कोळी सरांनी खेळात सहभागी घेवून सर्वांचे लक्ष आकर्षित केले.त्यांना प्लेअर ऑफ द लीग पुरस्कार मिळाला.
मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार वसीम पटेल,बेस्ट बॉलरचा पुरस्कार अरुण नवाळे तर बेस्ट बॅटसमनचा पुरस्कार संतोष ठोमके यांनी पटकावला.
शिक्षकांच्यासाठी खेळ खेळणे हे महत्वाचे असते. पण शिक्षकांच्यासाठी कोणतीच स्पर्धा भरविली जात नाही. ही उणीव भरुन काढण्यासाठी
शिरोळ तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना उपशाखा शिरोळ यांचे संयोजनाखाली शिरोळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेचे यंदाचे ६ वे वर्ष होते.गेली ५ वर्षे स्पर्धा सर्व संघटना प्रतिनिधी व क्रिकेटप्रेमी शिक्षकांच्या सहकार्याने अतिशय उत्साहात पार पडल्या.
त्यासाठी आकर्षक चषक, खेळाडूसाठी कीटस,त्रयस्थ पंच,वैयक्तिक बक्षिसे यांचे नियोजन करण्यात आले होते.शिरोळ तालुक्यातील बॅ. बाळासाहेब खर्डेकर,साने गुरुजी व शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था कुरुंदवाड या पतसंस्थांचे बहुमोल सहकार्य लाभले तर शिक्षक संघटना, पतसंस्था यांचे पदाधिकारी व क्रिकेटप्रेमी शिक्षकांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले. एसटीपीएल चे लोण सर्वत्र पसरले असून खाजगी शाळांतील शिक्षक सामावून घेण्याची मागणी होत आहे.