यशवंत ब्रिगेड संघटनेच्या वतीने महिलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी हाळदीकुंकु आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दत्त नगर येथील महिलांनी मोठ्या संख्येने स्पर्धे मध्ये सहभाग घेतला होता.
महिला दिना निमित्त खास महिलासांठी डॉ.पायल अंगराज माने यांचे महिलांच्या आरोग्यविषयी व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते. याबरोबरच संगित खुर्ची, फुगा फुगवून फोडणे, आरतीचे ताट तयार करणे, तळ्यात मळ्यात यासारखे खेळ घेण्यात आले होते. यामध्ये पहिले बक्षिस सौ.धनश्री तावदारे, यांना पैठणी, व्दितीय बक्षिस आरती खोत यांना सोन्याची नथ, तृतीय बक्षिस सौ.शिवानी पाटील यांना चांदीची जोडवी, चौथे गिरीजा कुटाळे यांना बाऊल सेट, पाचवे सौ. आरती माने यांना ग्लॉस सेट अशी बक्षिसे मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.इंद्रयणी अमरसिंह माने पाटील होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे महिलांना एक चांगली पर्वनी मिळाली असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यशवंत बिग्रेड संघटनेच्या महिला अध्यक्षा सौ.योगिता घुलेल आणि स्वराज्य मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले होते.