Spread the love

शिरोळ तालुका व परिसरात कर्करोग मोठ्या प्रमाणात पसरत आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. यामुळेच महिला दिनानिमित्त शनिवारी 9 मार्च रोजी सुप्रसिध्द कॅन्सर तज्ञ डॅा. श्रीनिकेतन काळे सर यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक महिला दिनानिमित्त सांगली येथील वैद्यकीय क्षेत्राती प्रसिध्द सर्जन डॉ. श्रीनिकेतन काळे यांचे कर्करोगाबाबत माहिती व घ्यावयाची काळजी याविषयीच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या इंद्रायणी पाटील होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, कॅन्सरविषयी जागृती करणे ही खरोखर काळाची गरज आहे. आणि महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करून समाजामध्ये जागृती केली हे कौतुकास्पद आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी प्रास्ताविक सौ. प्राजक्ता गोंदकर, परिचय व माहिती सौ. मनिषा कुंभार, सूत्रसंचालन जयश्री पाटील यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चिंतामणी गोंदकर, सनी पाटील, सचिन माळी, अभिजित गुरव, श्री अनिकेत महाराज यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी उज्वला पाटील, विद्या कोळी, अनुराधा माने, शुभांगी फल्ले, सुजाता पाटील, सुजाता कुलकर्णी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.