Spread the love

  शिरोळ येथील रमाबाई हाऊसिंग सोसायटी मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी उखाणे स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा संगीत खुर्ची लिंबू चमचा आदि कार्यक्रमांचे नेटके नियोजन करण्यात आले होते त्यास उस्फुर्त महिलांनी प्रतिसाद दिला

   प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन माजी जि प सदस्या सौ इंद्रायणी पाटील माजी उप नगराध्यक्ष जयश्री धर्माधिकारी व सौ कुमुदिनी कांबळे यांच्या हस्ते प्रज्वलन करण्यात आले यावेळी बोलताना सौ इंद्रायणी पाटील म्हणाल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांचा हिताकरता जे संविधानामध्ये कायदे कानून केले आहे त्याचा परिपूर्ण फायदा आता महिलांना होत आहे भगवान गौतम बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्त्रीमुक्तीच्या चळवळीचा परिपाक संविधानामध्ये दिसून येतो असे सांगून त्यांनी विविध क्षेत्रात महिलांनी केलेला नेत्र दीपक प्रगतीचा आढावा घेतला तर मा उपनगराध्यक्ष जयश्री धर्माधिकारी म्हणाल्या महिलांनी मुलांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजे तरच एक आदर्श पिढी जगाच्या स्पर्धेला सामोरे जाऊ शकेल महिलांना स्वातंत्र्य म्हणजे बेफिकिरीची वागणूक नव्हे तर स्वातंत्र्याचा लाभ उठून आपली प्रगती साधली पाहिजे टीव्ही मोबाईल मुळे मुलींच्यावर विपरीत परिणाम होत आहेत त्याला आळा घालण्याचे काम आपण केले पाहिजे तर यावेळी सौ कांबळे यांनी स्त्रीमुक्ती चळवळीचा आढावा घेऊन माता जिजाऊ रमाई भिमाई यांनी केलेल्या त्यागाच्या आठवण करून दिल्या याप्रसंगी शेवंता बनसोडे यांच्या परिवाराच्या वतीने महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या, सर्वांचे स्वागत भारती कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रणयश्री आळतेकर हिने केले .  या कार्यक्रमास सौ मंगल कांबळे (माजी सरपंच) शेवंता बनसोडे रुसकांती कांबळे सौ नयना कांबळे उज्वला कुरणे माया कांबळे स्वाती कांबळे लक्ष्मी कांबळे स्नेहलता खातेदार रेखा कांबळे नीलम कांबळे सौ लता कांबळे सौ ऐश्वर्या मंगसुळे सौ लता बापू कांबळे सौ सुमन कांबळे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या