Spread the love

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सूप्त कलागुणांना वाव

शिरोळ : प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन हे उत्कृष्ट व्यासपीठ आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि शाळेच्या भौतिक प्रगती करिता विविध उपक्रम राजाराम विद्यालय नेहमीच राबविण्याचा प्रयत्न करत असल्याने या शाळेने  उपक्रमशील शाळा अशी ओळख निर्माण केली आहे शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष डॉ अरविंद माने यांनी दिले

येथील राजाराम विद्यालय शिरोळ नं 2 या शाळेचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनाच्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून माजी नगरसेवक डॉ अरविंद माने हे बोलत होते तर समारंभाचे प्रमुख पाहुणे युवा उद्योजक अभिजीत माने माजी जिल्हा परिषद सदस्या सौ इंद्रायणी पाटील नगरपरिषदेचे कर प्रशासन अधिकारी म्हणून नुकतीच निवड झालेल्या प्रगती विजय पवार – चौगुले माजी ग्रामपंचायत सदस्या सौ शुभांगी फल्ले शिरोळ पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत केंद्रप्रमुख अण्णा मुंडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य आणि महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा व शाळेस स्वखर्चातून स्वागत कमान बांधून दिल्याबद्दल अध्यापिका श्रीमती सुनंदा पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. या समारंभात सौ इंद्रायणी पाटील सौ शुभांगी फल्ले प्रगती पवार चौगुले अण्णा मुंडे दीपक कामत यांनी मनोगत व्यक्त करून वार्षिक स्नेहसंमेलनास शुभेच्छा दिल्या. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर केले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारास उपस्थित आणि रोख रकमेची बक्षीस देऊन दाद दिली. या समारंभास शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ शितल जगदाळे सदस्या प्रियंका इंगळे सारिका सकट सदस्य रवींद्र पाटील मारुती जाधव गजानन सावंत दत्तात्रय पुजारी राहुल भोसले सुरेश गावडे सचिन सावंत शाळेतील शिक्षक सुनंदा पाटील त्रिशला येळगुडे मीनाक्षी हेगाण्णा यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन शिक्षक सनी सुतार यांनी केले स्वागत शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व पत्रकार चंद्रकांत भाट यांनी तर शाळेच्या मुख्याध्यापिका नीता चव्हाण यांनी प्रास्ताविक केले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी आभार मानले