Spread the love


सांगली/प्रतिनिधी
सांगली लोकसभा मतदार संघ हा आपला बालेकिल्ला आहे. सर्वात जास्त मंत्री या जिल्ह्यातुन नेहमी जातात, त्यामुळे यावेळी आपण लोकसभा सोडायची नाही. आता पासुन मतदार संघ भक्कम करण्यासाठी कामाला लागा असे अवाहन कोल्हापुर जिल्हा युवक कॉग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष आणि इचलकरंजी विधान सभा युवक कॉग्रेस निरक्षक अमरसिंह कांबळे यांनी केले.
वाढती महागाई, पेट्रोलचे चढे दर, भष्ट्राचार यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे जगने मुश्कील झाल आहे. नागरीकांच्यात कॉग्रेसला चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे विशाल दादा उच्चांकीमताने निवडणू आणण्यासाठी आतापासुन मतदारसंघ पिंजुन काढा, कॉग्रेसची सत्ता येण्यासाठी हडाचे काडे आणि रक्ताचे पाणी करा असे अवाहन करण्यात आले. ते कवठेमंकाळ येथील कॉग्रेस पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना मागदर्शन करताना म्हणाले. यावेळी कवठेमंकाळ तालुका कार्याध्यक्ष अविराज शिंदे सरकार, सेवादलाचे कार्यध्यक्ष श्रीकांत फाकडे, तालुका मागासवर्गीय सेलचे दिगंबर लोफ्लढे, सीताराम कांबळे, सुनिल वाघमारे, निवृत्त नायब तहसिलदार अशोकराव कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.