Spread the love

विना परवाना बांधकामाचे व अनाधिकृत भुखंडाचे नियमितीकरण्यासाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन – मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव
विना परवाना बांधकामाचे व अनाधिकृत भुखंडाचे नियमितीकरण करण्यासाठी शिरोळ नगरपालिके मार्फत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरोळ गणेशनगर येथील गणेशमंदिर येथे 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता या शिबीराचे आयोजन केले आहे. विनापरवाना बांधकामाचे व अनाधिकृत भुखंडाच्या नियमितीकरणा आभावी नागरीकांना शासकीय कामे, बॅकेतील कामे यामध्ये अडचणी निर्माण होत असतात, हिच बाब लक्षात घेवून शिरोळचे कर्तत्वदक्ष मुख्याधिकरी निशिकांत प्रचंडराव यांनी शिरोळ नगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले आहे. तरी नागरीकांनी गुंठेवारी नियमितकरण्यासाठी विहीत नमुण्यातील अर्ज,जागेचा सात बारा उतारा, जागेचा नकाशा, जागेची खरेदीदस्त झेराक्स प्रत, अभिवचन, कब्जेपट्टी पत्र, ज्या भुखंडाचे नियमितीकरण करायचे आहे, त्या भुखंडाचा अभियंत्याकडून नकाशा,हमीपत्र, समंतीपत्र, घरपट्टी व पाणीपट्टी भरलेली पावती आदीसह कागदपत्रे घेवून यावे असे अवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महान कार्य न्युजसाठी शिरोळहून महेश पवार