शिरोळ : प्रतिनिधी : मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषणास सुरुवात करून मराठा आरक्षणाचा लढा सुरू केला असून त्यास पाठिंबा देण्यासाठी शिरोळ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणास शिरोळ तालुका व शिरोळ शहरातील समस्त धनगर समाजाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला.
मराठा समाज हा आमचा मोठा । भावा समान असून या समाजाला तातडीने आरक्षण सरकारने जाहीर करावे.मराठा आरक्षण सर्वसामान्यांशी निगडित जिव्हाळ्याचा विषय असून राज्य सरकारने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मनोज जरांगे-पाटील यांचे पाचव्या दिवशी आमरण उपोषणाचे आंदोलन सुरू असून राज्यभरातून त्यांना वाढता पाठिंबा आहे. राज्य सरकारने वेळीच याबाबतीत योग्य आणि तत्काळ निर्णय घ्यावा. तसेच सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात समस्त धनगर समाज मराठा समाजाच्या कायम पाठीशी असल्याचे पाठिंबाच्या पत्रात म्हटले आहे सदर पाठिंबाचे पत्र धनगर समाजाच्या वतीने शिरोळ सकल मराठा समाज चक्री उपोषणाचे समन्वयक धनाजी पाटील नरदेकर व बजरंग काळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले
याप्रसंगी धनगर समाजाचे प्रतिनिधी व शिरोळचे नगरसेवक योगेश पुजारी भिमराव पुजारी चंद्रकांत पुजारी देवप्पा पुजारी ,राजु बरगाले नेमिनाथ पुजारी, अरुण पुजारी विष्णु पुजारी , आनंद पुजारी भरमा पुजारी,विशाल पुजारी, , प्रकाश पुजारी यांच्यासह धनगर समाज बांधव उपस्थित होते