djfhjdssh
Spread the love

जयसिंगपूर-
गेले अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहेत. अनेक मोठे राज्यव्यापी मोर्चे, शांततेच्या मार्गाने आंदोलने करत आरक्षणाची मागणी मराठा समाजाने लावुन धरली आहे, सध्या राज्यभरामध्ये मराठा समाज आक्रमक होत आहे, अनेक बेरोजगार मराठा समाजातील युवक आत्महत्या करत आहेत, राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ पाहत आहे त्याचबरोबर धनगर समाज ही आपल्या आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे.सध्याची तणावपुर्ण परिस्थीती व लोकभावना लक्षात घेता मराठा व धनगर समाजाला सरकारला आरक्षण द्यावेच लागेल असे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हंटले आहे. आपण आरक्षणाबाबत राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांना पत्र लिहिले असून या दोन्ही समाजाच्या भावना व निर्माण होत असलेल्या परिस्थितीबद्दल अवलोकित केले आहे. राज्य शासनाने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा व तातडीने मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी केली असल्याचेही आमदार यड्रावकर यांनी म्हंटले आहे, या प्रश्नाबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांची उद्या भेट घेणार असून या दोन्ही समाजाच्या आरक्षणाबाबत आग्रही राहणार आहे. असे सांगताना गेली अनेक वर्ष हे दोन्ही समाज शांततेच्या मार्गाने आंदोलने करीत आपल्याला आरक्षण मिळावे म्हणून संघर्ष करीत आहेत यामध्ये अनेक तरुणांनी समाजाच्या मागणीसाठी बलिदान दिले आहे. आता यापुढे आरक्षणाबाबत हालचाली गतिमान झाल्या पाहिजेत, तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे देता येते याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा व मराठा व धनगर समाजाची अनेक वर्षाची न्याय मागणी पूर्ण करावी असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेवटी म्हंटले आहे.