Spread the love

शिरोळ येथील सकल मराठा समाजाच्या चक्री उपोषणास दिला पाठिंबा

शिरोळ : प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनत चालली आहे यामुळे मराठा समाजात संताप व्यक्त होत आहे शासनाने याचा गांभीर्याने विचार करून तात्काळ मराठा समाजास आरक्षण द्यावे अशी मागणी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी शिरोळ येथे केली. शिरोळमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात श्री दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.  

   

यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले की मराठा समाजास आरक्षण मिळावे ही मागणी रास्त आहे यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे याकरता काहींनी आपल्या जीवाचे बलिदान सुद्धा दिले आहे मराठा आरक्षणाच्या लढ्यात आता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेली पाच दिवस आमरण उपोषण करीत आहे त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनत चालली आहे त्यांची तब्येत ठीक राहावी अशी प्रार्थना त्यांनी करून शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी केली .याप्रसंगी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील माजी सरपंच गजानन संकपाळ दत्त वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरंदेकर. बजरंग काळे किरण पाटील कणंगलेकर यांच्यासह शिरोळ मधील सर्व ग्रामस्थ तरुण मंडळाचे सदस्य उपस्थित होते

दरम्यान आंदोलन स्थळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव भारतीय जनता युवा मोर्चाचे कोल्हापूर जिल्हा पूर्व ग्रामीणचे अध्यक्ष डॉ अरविंद माने श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे नगरसेवक योगेश पुजारी माजी नगरसेवक विजय उर्फ दादासो कोळी पत्रकार चंद्रकांत भाट अमोल हिरेमठ भीमराव पुजारी विजय आरगे बापूसाहेब गंगधर बाळासाहेब कोळी शिवाजी पाटील कौलवकर संजय चव्हाण सतीश आडगुळे शक्तीजीत गुरव गुरुदत्त देसाई अमित उर्फ बंटी संकपाळ उमेश माने निलेश गावडे दिग्विजय माने ओंकार गावडे शिरोळ शहर धनगर समाज बांधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला सोमवारी चक्री उपोषणामध्ये शहरातील जय हनुमान तालीम मंडळ शिवशक्ती मंडळ व श्री राम मंडळ या मंडळातील सकल मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतला होता उपस्थित अनेक मान्यवरांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपल्या भावना तीव्र स्वरूपात व्यक्त करून शासनाने मराठा समाजाच्या रोषाला सामोरे न जाता तात्काळ मराठा समाजास आरक्षण द्यावे अशी मागणी केली