शिरोळ / प्रतिनिधी:
ब्रह्मकुमारी सेवा संस्थेचा वैद्यकीय विभाग व केंद्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यात 9 ते 21 ऑक्टोंबर अखेर व्यसनमुक्त अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती अभियानाच्या संचालिका ब्रह्मकुमारी राजयोगिनी सुनिता दीदी शिरोळ येथील पत्रकार परिषदे मध्ये दिली.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सध्या तरुण वर्गामध्ये व्यसन वाढले आहे. तंबाखू ,गुटखा, सिगारेट, ड्रॅग ,दारू याबरोबरच मोबाईल सारख्या साधनांचे व्यसन लागले आहे. या व्यसनामुळे लोकांना सामाजिक आरोग्य ,आर्थिक विषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. भारतात दररोज 14 ते 18 वयोगटातील 5500 मुले व्यसनाधीन होत आहेत. तर साडेतेरा लाख लोकांचा मृत्यू तंबाखूचे व्यसनामुळे होत आहेत. ही व्यसने दूर करण्यासाठी उचित मार्गदर्शन समुपदेशन औषधे, सात्विक आहार व योग आवश्यक आहे . हे सर्व मार्गदर्शन करण्यासाठीच ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान राबवले जाणार आहे. आज प्रबोधन रथ शिरोळ येथील ब्रम्हाकुमारीज विद्यालयामध्ये दाखल झाला. याचे उद्घाटन तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने करण्यात आले. हा प्रबोधन रथ तालुक्यातील प्रत्येक गावात जावून विद्यालये, महाविद्यालये आणि काही ठिकाणी ग्राम सभा घेवून युवकांच्यात जागृती केली जाणार आहे. युवा वर्ग हा देशाचा कणा आहे. पण सध्या तो अनेक प्रकारच्या विध्वसंक कार्यात पुढे येताना दिसत आहे. तरूणांना सुरवातील अनेक प्रकारची अमिष दाखवले जातात, आणि तरूण पुढे येतात आणि विळख्यात आडकतात. त्यांची या विळख्यातुन सुटका व्हावी. त्यांची शारीरीक शक्ती आणि मानसिक शक्तीची जाणीव होवून राष्ट्राच्या कार्यात त्यांची डब्बल पॉवर लागावी यासाठीच आम्ही हे अभियान राबवत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सुनिता दिदी, शितल खोत, डॉ वर्षा बेहनजी, शिरदवाड येथील कुमार सचिन भाई आदी उपस्थित होते. महान कार्य न्युजसाठी शिरोळहून महेश पवार