Spread the love

जायटंस् ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीच्या वतीने पत्रकारांचा सत्कार
शिरोळ : प्रतिनिधी : लोकशाही मधील चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी सर्वच पत्रकार लिखाणाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे करीत असतात  समाजाभिमुख कामातही त्यांचे पत्रकारांचे कार्य उल्लेखनीय आहे असे विचार जायटंस् फेडरेशनच्या समन्वयक डॉ स्नेहल कुलकर्णी यांनी व्यक्त केले
मौजे आगर येथील जायटंस् ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीच्या वतीने शिरोळ येथे शिरोळ शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी त्या बोलत होत्या शिरोळ शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष डी आर पाटील उपाध्यक्ष बाळासाहेब माळी सचिव डॉ दगडू माने खजिनदार चंद्रकांत भाट सदस्य सुनील इनामदार आनंदा शिंगे महेश पवार बाळासाहेब कांबळे संदीप बावचे संदीप इंगळे सुरेश कांबळे यांचा सत्कार करण्यात आला
जायटंस् फेडरेशनचे स्पेशल ऑफिसर सुधीर कुलकर्णी पत्रकार डॉ दगडू माने चंद्रकांत भाट यांनी मनोगत व्यक्त केले जायटंस् ग्रुप ऑफ दुर्गा सहेलीच्या अध्यक्षा अश्विनी नरुटे सचिव प्रतिभा ढापरे सदस्या नलिनी देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते