पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथील संत रोहिदास तरुण मंडळ येथे आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास गावातील तरुणांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले या शिबिरात शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराचे स्थानिक पातळीवर खूप कौतुक झाले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिरोलीचे उपसरपंच अविनाश कोळी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल जिल्हा कार्यवाहक प्रशांत कागले यांच्या शुभहस्ते करण्यात आले
यावेळी शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले
– नमस्कार मित्रांनो कृपया रक्तदान करा आणि माझा वाढदिवस अविस्मरणीय बनवा अशा ब्रिद वाक्याने प्रेरित करत निलेश शिंदे यांच्या आवाहनाला संत रोहिदास तरुण मंडळ विश्व हिंदू परिषद बजरंग दल गावातील तरुण मंडळाचे सदस्यांनी मोठा प्रतिसाद दिला. वाढदिवसाचे औचित्य म्हणून सुमारे १०० अधिक रक्ताच्या बॅग जमा झाल्या. डोंबिवलीतील संजीवन ब्लड बँकेच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम पार पडला. सर्वांनी या सामाजिक कार्यात सहकार्य केल्याबद्दल निलेश शिंदे जिल्हा संयोजक बजरंग दल व संत रोहिदास तरुण मंडळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
कोरोना काळात ऑक्सिजन आणि ब्लड आदींचे महत्व सर्वांना कळून आले आहे. रक्त दान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ते सिद्धही होत आहे. ज्याला रक्ताची आवश्यकता असते तेव्हा ते महत्व कळून येते त्यामुळेच सामाजिक बांधिलकी म्हणून अशा प्रकारचे कार्य केले पाहीजे हा विचार मनात आल्याने हे रक्तदान शिबीरचे वाढदिवसाचा दिवशी आयोजित केले. आमच्या मंडळाचे सर्व सदस्यांनी तसेच मित्रमंडळींनी या कार्यात सहभागी होऊन आज हे कार्य पार पडले आहे असे वाढदिवसाच्या उत्सवमूर्ती निलेश शिंदे यांनी सांगितले. या रक्तदान शिबिराला संजीवन ब्लड बँके उजळाईवाडी चे गौतम बावगे ,अनिल सरनोबत ,अमोल गुरव ,रितेश ,रवी यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी उपस्थित गणेश जी शास्त्री सचिन जी पवार सोमेश्वर जी वाघमोडे सुजित कांबळे राजू शिंदे लखन पवार अशोक पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते