Spread the love


कोल्हापूर/ प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीजनमधून आकारास आलेले महिला विधेयक आपल्या कुटुंबासाठी आहे. या दृष्टीने राज्यकर्त्यांनी पाहू नये असे विचार खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेत मांडले. जो घटक आजपर्यंत राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजुला राहिला आहे. त्यांना कुठेतरी योग्य संधी मिळाली पाहिजे. ही या मागील संकल्पना आहे. त्यांनाही या विधेयकाच्या निमित्ताने सर्वाच्च अशा कायदे मंडळात ठसा उमटवण्याची संधी मिळेल. असा विश्‍वासही खा.माने यांनी बोलून दाखवला.
संसदेच्या विशेष अधिवेशनात खा.माने यांनी विधेयकाला पाठींबा देत जोरदार भूमिका मांडली. त्यांनी आई माजी खासदार निवेदिता माने यांचा संघर्षमय पट ही सभागृहात मांडला. यावेळी त्यांनी करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या कार्याचाही आढावा घेतला, ते म्हणाले, मी तीन वर्षांचा असताना वडीलांचे निधन झाले. आजोबा खा.बाळासाहेब माने यांच्या निधनानंतर तब्बल पाच वेळा निवेदिना माने यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. तीन वेळा पराभव झाल्या, दोन वेळा खासदार म्हणून विजयी झाल्या. महिला आरक्षण नसतानाही संघर्ष करण लोकसभेपर्यंत त्यांनी मजल मारली. कायदेमंडळाच्या सर्वाच्च सभागृहात त्यांना काम करण्याची संधी मिळाली हे आमच्या कुटुंबाच भाग्य समजतो. आज सभागृहात असलेल्या महिला खासदारांनीही मोठ्या संघर्षातून लोकसभेची पायरी चढली आहेत. आता त्यांच्या हक्काच विधेयक सर्व सहमतीने मंजूर होईल. ज्यांची क्षमता असूनही समाजात उपेक्षित राहिलेल्या महिलांना, भगिनींना या विधेयकामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या विधेयकामुळे नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. यास शिवसेना पक्षाच्यावतीने समर्थन देत असल्याचे सांगितले.