Spread the love

आळते/महान कार्य वृत्तसेवा

हातकणंगले तालुक्यातील आळते येथे डेंग्युच्या साथीने अक्षरश: उद्रेक झाला आहे. खासगी शासकीय दवाखान्यात 400 हून अधिक जन उपचारासाठी दाखल झाले आहेत. यामुळे नागरिक भितीच्या धायेखाली आहेत. तर रविवारी रात्री समिना शागिर मेवेकरी या विवाहितेचा पहिला बळी गेल्यानंतर शासकीय यंत्रणा हादरून गेली असून गट विकास अधिकारी, आरोग्य अधिकारी यांनी गावास भेट देऊन तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान ग्रामपंचायत आणि सामाजिक संघटनांकडून तातडीने उपाय योजना सुरु केल्याने नागरिकांना काहीसा दिलास मिळालेला आहे. तर नागरिकांनी दक्षता घ्यावी. आरोग्य यंत्रणेकडून दिलेल्या सूचनांचे पाळन करावे. नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन सरपंच अजिंक्य इंगवले यांनी केले आहे.

वॉर्ड क्र.4 मध्ये डेंग्युचे संशयीत आढळून आलेे होते. उपचारानंतर रुग्ण बरे झाले, मात्र 15 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात संशयीत आढळून येत आहेत.
खासगी दवाखाने ओव्हरफ्लो
डेंग्युची साथ झपाट्याने फैलाव होत असल्याने गावातील खासगी दवाखाने ओव्हरफ्लो झाले आहेत. तर काहीजन इचलकरंजी, कोल्हापूर, मिरज, सांगली, हातकणंगले येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्यामुळे रुग्णांचा निश्‍चित आकडता आणि कोणाचा भागात तीव्रता अधीक आहे याची निश्‍चत माहीती समोर आली नाही.