Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी
अत्यंत अटीतटीच्या व उत्कंठा वाढविणाऱ्या येथील भैय्या प्रेमी ग्रुप आयोजित शिरोळ नगराध्यक्ष दहीहंडी फोडून जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक मिळवला. डोळ्याचे पारणे फेडणारा आणि गर्दीचे विक्रम मोडणारा..”असा अविस्मरणीय क्षण नागरिकांनी अनुभवला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या दिमाखात हा दहिहंडी सोहळा साजरा झाला. डीजेचा आवाज,,,,लक्षवेधी विद्युत रोषणाई,,,,, प्रेक्षकांची अलोट गर्दी यामुळे दहीहंडी उत्सवाच्या आनंदाला उधाण आले . या स्पर्धेत शिरोळमधील अजिंक्यतारा मंडळ , जय महाराष्ट्र मंडळ , हनुमान तालीम मंडळ , गोडी विहीर मंडळ , एस पी बॉईज गोडी विहीर तरुण मंडळ , जय भवानी गोविंदा पथक , विजयसिंहनगर गोविंदा पथक सहभागी झाले होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून
नगराध्यक्ष शिरोळ दहीहंडी ‘ उत्सव सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सहभागी दहीहंडी पथकातील गोविंदांना स्पर्धेची नियमावली व माहिती संयोजकांनी दिली . यावेळी तीन फेऱ्यांमध्ये चिट्ठी काढून गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात आला .
प्रत्येकी दहीहंडी संघाने पाच ते सहा चित्तथरारक मानवी मनोरे रचून सलामी दिली . त्यानंतर दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र आंतर मोठे असल्याने संयोजकांनी कालांतराने नियमानुसार दहीहंडी खाली घेत दहीहंडी फोडण्याची संधी गोविंदा पथकाल दिली. अखेर सुमारे ३५ फूटावर असलेली दहीहंडी सहा मानवी मनोरे रचत जय महाराष्ट्र मंडळाने अखेर दहीहंडी फोडली. या सोहळ्यास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर , श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील , जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील -यड्रावकर, युवा नेते आदित्य राजेंद्र पाटील यड्रावकर , शिरोळचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव, कोल्हापूर जिल्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ अरविंद माने, शिरोळ तालुका भाजपा अध्यक्ष मुकुंद गावडे , माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील ,अजिंक्यसिंह पाटील, धैर्यशीलसिंह पाटील , विशालसिंह पाटील ,प्रा अण्णासाहेब गावडे ,रणजीतसिंह पाटील , सुभाष माळी , सनीसिंग पाटील , लक्ष्मण भोसले , सचिन माळी , दिनकर पाटील , एन वाय जाधव , प्रा चंद्रकांत गावडे , रावसाहेब पाटील – मलिकवाडे , विजयसिंह देशमुख , महेश देशमुख ,चंद्रकांत चुडमुंगे , अभिजीत माळी, बंटी संकपाळ , डॉ.दगडू माने , फतेलाल मेस्त्री , अनिरुद्ध जोशी, प्रतिक धर्माधिकारी, राजेंद्र माने
आदि उपस्थितीत होते. महेश घोटणे यांनी सूत्रसंचालन केले