जर्मन गॅंगचा म्होरक्या आनंद्या जर्मनीने पोलीस कोठडीतच विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न, पोलीस प्रशासनात खळबळ
सिटी रिपोर्टर महान कार्य वृत्त सेवा येथील व्यावसायिक सरदार मुजावर अपहरण प्रकरणात शहापूर पोलिसांच्या ताब्यात असलेला जर्मन गॅंगचा म्होरक्या आनंद्या जर्मन व अक्षय कोंडुगळे यानी शहापूर पोलीस कस्टडीत सोमवारी दुपारी विष प्राशन केल्याने पोलीस प्रशासनासह इचलकरंजी मध्ये एकच खळबळ माजली आहे. येथील आयजीएम येथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर येथे दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. दुपारी येथील आयजीएम येथे आनंद्या जर्मनीचे कुटुंबीय व जर्मन गॅंगचे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
