Spread the love


शिरोळ : प्रतिनिधी

शिरोळ नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदी राजश्री शाहू विकास आघाडीचे रावसाहेब प्रल्हाद पाटील- मलिकवाडे यांची बिनविरोध निवड झाली निवडीनंतर पाटील- मलिकवाडे समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला

प्रा अण्णासाहेब माने गावडे यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता यामुळे स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीसाठी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची विशेष सभा झाली या सभेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजश्री शाहू विकास आघाडीचे रावसाहेब प्रल्हाद पाटील-मलिकवाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची स्वीकृत नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाल्याचे सभेचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी घोषित केले या निवडीनंतर पाटील-मलिकवाडे समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला तसेच हलगीचा कडकडाट आणि डॉल्बीच्या दणदणाटामध्ये स्वीकृत नगरसेवक रावसाहेब पाटील-मलिकवाडे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.
नगराध्यक्ष अमरसिंह पाटील नगरसेवक प्रकाश गावडे यांनी मनोगत व्यक्त करून नूतन स्वीकृत नगरसेवक रावसाहेब पाटील-मलिकवाडे शिरोळ शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे अशा शुभेच्छा दिल्या.

नूतन नगरसेवक रावसाहेब पाटील-मलिकवाडे बोलताना म्हणाले की राजश्री शाहू विकास आघाडीचे नेते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी खासदार राजू शेट्टी श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील नगराध्यक्ष अमरसिंह पाटील माजी सरपंच अर्जुन काळे माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील यांच्यासह राजश्री शाहू विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी स्वीकृत नगरसेवक पदी संधी दिली याबद्दल सर्वांचे मनापासून आभार शिरोळ शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी पालिकेचे कार्यालयीन निरीक्षक संदीप चूडमुंगे आणि सर्व अधिकारी उपनगराध्यक्षा सौ. करुणा कांबळे, नगरसेवक योगेश पुजारी , राजेंद्र माने , श्रीवर्धन माने देशमुख, इम्रान अत्तार, राजाराम कोळी, डॉ अरवींद माने, कुमुदिनी कांबळे , कमलाबाई शिंदे, जयश्री धर्माधिकारी, सुरेखा पुजारी, माजी सरपंच अर्जुन काळे, माजी नगरसेवक एन वाय जाधव उद्योगपती दयानंद जाधव सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कांबळे सुरज कांबळे, सुभाष माळी, दिनकर पाटील प्रशांत पाटील शिवाजी काळे रमेश माने अशोक माने वसंतराव पाटील यांच्यासह पाटील समर्थक व राजश्री शाहू विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते