Spread the love

सिटी रिपोर्टर /महान कार्य वृत्तसेवा

अंतरवाली सराटी या ठिकाणी झालेल्या मराठा समाजाच्या लाटी हल्ल्याच्या निषेधार्थ व त्या ठिकाणी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी इचलकरंजीत मोर्चा काढून प्रांताधिकारी यांच्या प्रतिनिधीला गांधी पुतळा या ठिकाणी इचलकरंजी सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. सकाळपासूनच इचलकरंजी शहरातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून मोर्चात मध्ये सामील झाले होते.

बुधवार सहा ऑगस्ट रोजी इचलकरंजी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून गांधी पुतळ्यापर्यंत मोर्चा काढला होता. यावेळी दिवसभर व्यापाऱ्याने आपला बंद पाळावा असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सकल मराठा समाजाचे अध्यक्ष पैलवान अमृत भोसले म्हणाले शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये मराठा समाजाला तात्काळ न्यायालय मध्ये टिकणारा आरक्षण द्यावे . शासनाने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.या प्रसंगी पुंडलिक (भाऊ ) जाधव बोलताना म्हणाले मराठा समाज छत्रपती उदयनराजे व छत्रपती संभाजी राजे यांचे नेतृत्व मानतो भविष्यामध्ये जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल राज्यकर्त्यांना हा इशारा आहे की हीच वेळ आहे मराठा समाजाला न्याय देण्याची. महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री व मंत्री झाले पण कोणालाही या समाजाकडे पहावे वाटले नाही.


आजचा मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला होता. यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा, आशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता या प्रसंगी एस आर पी यांच्या तुकड्या ही मागवण्यात आल्या आहेत. मुस्लिम समाजाच्या वतीने एसटी बस स्थानक परिसरातील रेयाॅन पेट्रोल पंपाजवळ मोर्चेकरांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन सकल मराठा समाजाच्या बंद व मोर्चाला पाठिंबा दिला.