इचलकरंजी राष्ट्रवादी शहर व जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडचिट्टी देत उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या साक्षीने मुंबईत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.
इचलकरंजी सुळकूड पाणी योजनेचे निमंत्रक माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शहर व जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दाखल झाल्यामुळे इचलकरंजी शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गट अधिक सक्षम होणार असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत विठ्ठल चोपडे यांच्या माध्यमातून अजित पवार गटाला बळ मिळणार आहे. इचलकरंजी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार त्यांच्या बंडानंतर पवार यांच्या राष्ट्रवादी सामील झाले होते यामुळे येथील अजित पवार गटाला सक्षम नेतृत्व नव्हते. विठ्ठल चोपडे यांच्या अजित पवार गटातील प्रवेशामुळे येणाऱ्या काही दिवसात येथील राष्ट्रवादी राजकीय घडामोडी घडणार असल्याचे चित्र आहे एकंदरीत विठ्ठल चोपडे यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेशामुळे शहरातील माजी आमदार अशोकराव जांभळे व मदन कारंडे गटाला धक्का बसला आहे. विठ्ठल चोपडे यांच्याबरोबर , माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट, माजी नगरसेवक श्रीकांत कांबळे, माजी नगरसेविका शहर महिला आघाडी माधुरी चव्हाण, माजी नगरसेवक दत्ता देडे, माजी नगरसेवक आबा निंऊगरे, गणेश माछरे, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस निहाल कलावंत, शहराध्यक्ष राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडी सलीम ढालाईत, राज्य सचिव विद्यार्थी आघाडी उत्कर्ष सूर्यवंशी, जिल्हा कार्यकारणी सदस्य दिलावर पाटील, रांगोळी शहराध्यक्ष विद्यार्थी आघाडी अर्थव जाधव, शहराध्यक्ष भटके विमुक्त आघाडी अमोल मद्यपगोळ, माजी अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती राजू रावळ, माजी अध्यक्ष सेवा दल प्रकाश जगताप, शहर युवक उपाध्यक्ष प्रमोद दाडमोदे, जिल्हाप्रमुख शिवसेना वैद्यकीय आघाडी राजीव आरगे, सुनील बोणे, शहर उपाध्यक्ष कबनूर राहुल कांबळे, शहर युवक उपाध्यक्ष रजाक शेख, शहर उपाध्यक्ष मीडिया सेल प्रसाद तांबे, शहर उपाध्यक्ष सेवा दल नंदकुमार टेके, सुभाष मालपाणी, बाळासाहेब देशमुख, दगडू कुंभार,बबन इंगळे,शशिकांत कामत,
राहूल कांबळे,दिलावर पटेल, दिनेश दायमा, अब्राहम वाघमारे,
गिरीश शर्मा, सुखदेव लोकरे,अनिल गोफणे,हणमंत कांबळे, अविनाश बागडे, दत्ता केसरकर, योगेश डोईजड,
सागर गोफणे, पंकज गोफणे,
मारुती दळवी, शिवानंद रोकडे, विनायक शिंगारे, आशु माने, गणेश फडणीस, मेहबूब ढालाईत, गणेश तिप्पे, रोहन रोडे, कुणाल चंदुरे, आदींनी प्रवेश केला.