जालना येथे मराठा आंदोलकांच्यावर लाठी चार्ज केल्याच्या निषेधार्थ, आणि कठोर कारवाई व्हावी, समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठी खबरदारी घेत, मोठा पोलीस बंदोबस्त दाखल केला आहे.

शिवाजी चौक येथील ताराराणी तक्त येथे जमून तहसील कार्यालया वरती चालत मोर्चा येणार आहे. तालुक्यातून मराठा समाजाचे आंदोलक शिरोळ कडे येत आहेत. शिरोळ तालुका बंद हाकला मोठा प्रतिसाद मिळून आज शिरोळ कडकडीत बंद आहे.
