Spread the love

महाडिक कुटुंबियांना मोठा धक्का परिवारातील दहा जणांचा समावेश

कोल्हापूर/ महान कार्य वृत्तसेवा
बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे 1272 सभासद प्रादेशीक साखर सह संचालकांनी अपात्र ठरवले आहेत. महाडिक परिवाराला हा मोठा धक्का मानला जातो. त्यामुळे राजाराम कारखान्याची फेर निवडणूक घेण्यासाठी आ. सतेज पाटील गटाचे प्रयत्न सुरु झाले आहेत. अपात्र सभासदांमध्ये भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा यांच्यासह महाडिक परिवारातील 10 जणांचा समावेश आहे.
सर्वसामान्य सभासदांच्या पाठबळावर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. या निवडणुकीमध्ये एकूण 12336 इतके मतदान झाले. त्यामध्ये या अपात्र सभासदांच्या मतदानाचा समावेश होता. म्हणजे नियमित 11000 सभासदांचे मतदान झाले होते. यापैकी 5000 ते 5500 मते आमच्या आघाडीला मिळाली. त्यामुळे खर्‍या सभासदांचा कौल आमच्या आघाडीला मिळाला होता हे सिध्द झाले आहे. या अपात्र सभासदांचेमुळे आमच्या उमेदवारांना 1200 ते 1250 मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. जर हे अपात्र सभासद मतदानास पात्र झाले नसते तर आज कारखान्यावर आमचीच सत्ता असती हे स्पष्ट आहे. असे आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे. याकामी परिवर्तन आघाडीचे वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. प्रताप इंगळे, अ‍ॅड. यशदीप इंगळे, अ‍ॅड. केदार लाड, अ‍ॅड. पंडित अतिग्रे, अ‍ॅड. योगेश तेली यांनी काम पाहीले.
घटनाक्र्रम असा.
14/02/2020 – प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांनी सर्व चौकशी अंती 1346 सभासद अपात्र

  • 18/02/2021- वरील 1346 सभासदांचे अपात्रतेचा मा. प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांचा आदेश सहकार मंत्र्यांकडून कायम
    *22/09/2022- वरील 1346 सभासदांचे अपात्रतेचा मा. सहकार मंत्री व मा. प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांचा निर्णय मा. उच्च न्यायालयात कायम
  • 04/01/2023- वरील 1346 सभासदांचे अपात्रतेचा निर्णय मा. सुप्रिम कोर्टाने स्थगित करुन या सर्व अपात्र सभासदांची फेरसुनावणी घ्यावी म्हणून मा. प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांना आदेश
  • मे व जून 2023- मा. प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांनी सभासदांना व्यक्तीगत म्हणणे मांडणेसाठी संधी देवून त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले.
  • 01/09/2023- प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी या प्रकरणातील सर्व कायदेशीर बाबी तपासून गुणदोषावर आदेश दिला व या पूर्वी अपात्र ठरवलेल्या 1346 सभासदांपैकी 1272 सभासद अपात्र ठरविले.
  • मार्च व एप्रिल 2023 मध्ये कारखान्याची निवडणूक झाली. यामध्ये कारखान्याच्या सत्तारुढ आघाडीने निवडणुक अधिकार्‍यांवर राजकीय दबाव टाकून विरोधी आघाडीचे इच्छूक उमेदवारांपैकी 30 उमेदवारी अर्ज छाननीतून बेकायदेशीरपणे अवैध ठरवले.
  • निवडणुकीत महाडिक पॅनल विजयी झाले.