Spread the love

मुंबई ,23 ऑगस्ट
सध्या सर्वांच्या नजरा घड्याळाच्या काट्यावर खिळल्या आहेत. 23 ऑगस्टला म्हणजेच आज संध्याकाळी 6.00 वाजता विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. या क्षणांची वाट प्रत्येक भारतीय बघत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर ’सॉफ्ट लँडिंग’ करेल अशी अपेक्षा प्रत्येक भारतीय करत आहे. ’चंद्रयान-3’चे लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आज उतरतील. दरम्यान आता बॉलिवूडमधून ’चंद्रयान-3’बद्दल सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. अनुपम खेर, करीना कपूर खान, हेमा मालिनी, अक्षय कुमार आणि सुभाष घई यांनी अभिनंदनाचे संदेश दिले आहेत. याशिवाय आर माधवनने ’चंद्रयान 3’ मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना केली आहे.
आर माधवनचे टिवट : आर माधवनने ’चंद्रयान 3’ मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना केली आहे आणि अ‍ॅडव्हान्समध्ये अभिनंदनही केले आहे. आर. माधवनने त्याच्या टिवटमध्ये लिहिले, ’चंद्रयान 3’ नक्कीच यशस्वी होईल, माझे शब्द खरे ठरतील, इस्रोला अ‍ॅडव्हान्समध्ये अभिनंदन, या महान यशाबद्दल मला खूप आनंद आणि अभिमान आहे.
अनुपम खेरचे टिवट : अनुपम खेर यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आणि टिवट केले की, ’भारत चंद्रावरील तिसèया मोहिमेची तयारी करत असताना आमच्या शास्त्रज्ञांना चंद्रयानच्या मोहिमेसाठी शुभेच्छा. झंडा उंचा रहे हमारा. जय हिंद!’ टिवटसोबतच खेर यांनी लॉन्चिंगचा फोटोही शेअर केला आहे.
हेमा मालिनीने शेअर केला ’चंद्रयान 3’चा फोटो : बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीने ’चंद्रयान 3’चा फोटो शेअर करून एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये हेमाने लिहिले आहे की, ’चंद्रयान 3’ च्या लँडिंगसाठी शुभेच्छा. ’चंद्रयान 3’ लवकरच चंद्रावर उतरणार आहे. हा आपल्या देशासाठी अभिमानाचा क्षण असून या मोहिमेसाठी मी आणि सर्व देशवासीय प्रार्थना करत आहोत.
करीना कपूर खानची पोस्ट : ’चंद्रयान 3’ मिशनबाबत करीना कपूर खानची प्रतिक्रियाही खूप चर्चेत आहे. करीनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ’प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. मी ’चंद्रयान 3’ बद्दल उत्साहित आहे आणि 23 ऑगस्टच्या संध्याकाळी दोन्ही मुलांसोबत ’चंद्रयान 3’चे लँडिंग लाईव्ह पाहणार आहे.
अक्षय कुमारचे टिवट : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार मिशन मंगल चित्रपटाचा एक भाग होता. त्याने टिवटरवर ’चंद्रयान-3’च्या यशासाठी प्रार्थना केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले, ’आता वेळ उठण्याची आली आहे! इस्रोमधील आमच्या सर्व शास्त्रज्ञांना ’चंद्रयान-3’ साठी शुभेच्छा.’
सुभाष घई यांनी केले टिवट : प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनीही ’चंद्रयान-3’च्या लँडिंगपूर्वी शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच त्यांनी चंद्राशी संबंधित एक किस्साही शेअर केला आहे. सुभाष घई व्हिडिओमध्ये सांगत आहेत की, ’लहानपणी माझी आजी मला ताटात पाणी ठेवून चंद्र दाखवायची, किती गंमत आहे, आज 2023 मध्ये आपला देश खरोखरच चंद्रावर पोहोचला आहे. देशासाठी हे मोठे यश आहे. मी इस्रोचे अध्यक्ष आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देऊ इच्छितो आणि प्रार्थना करतो की विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर दिसावे. खूप खूप अभिनंदन.
चंद्रावर लवकरच असेल ’चंद्रयान-3’ : चंद्रावर भारताची पहिली मोहीम, चांद्रयान-1 ऑक्टोबर 2008 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. इस्रोने 2019 मध्ये ’चंद्रयान-2’ लाँच केले. आता ’चंद्रयान -3’ लकरच चंद्रावर पोहोचणार आहे. हा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप महत्वाचा असणार आहे. ’चंद्रयान -3’ साठी अनेक ठिकाणी पूजा आणि यज्ञ होत आहे. ’चंद्रयान -3’ आपल्या मिशनमध्ये यशस्वी होईल अशी अपेक्षा सर्वजण करत आहे.