कोल्हापूर,23 ऑगस्ट
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑगस्टला मराठा आरक्षणासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीदरम्यान झालेल्या एका गोपनीय बैठकीत एका प्रशासकीय अधिकाèयाने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं तर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असं वादग्रस्त वक्तव्य केल्याची सोशल मीडिया पोस्ट मराठा वनवास यात्रेचे प्रमुख योगेश केदार यांनी प्रसारित केली होती. तसेच याबाबत वृत्तपत्रांमधून बातमी प्रसारित झाल्यानंतर आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन याबाबत विचारणा केली. यावेळी जिल्हाधिकारी रेखावार आणि मराठा समाजाच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.
संजय पवारांचा इशारा : जिल्हाधिकारी कार्यालयात 15 ऑगस्टच्या दिवशी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाची बैठक झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अधिकाèयांची गोपनीय बैठक का घेतली गेली असा सवाल शिवसेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला. मराठा समाजाबद्दल जर कोणी अधिकाèयाने वादग्रस्त वक्तव्य केलं तर त्या अधिकाèयाला कोल्हापुरातील रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.
मराठा समाजाचे पदाधिकारी आक्रमक : 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत राज्यभरातील मराठा समाजाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मराठा कार्यकर्त्यांचा काहीसा वाद झाला होता. यामुळे बैठकीत काहीकाळ गोंधळ झाला. याबाबतच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्धही झाल्या. याच पार्श्वभूमीवर आज सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. या बैठकीत (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संजय पवारांनी, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा समाजाची गुप्त बैठक का घेतली, असा सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना जिल्हाधिकारी राहुल रेखावर म्हणाले की, उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतलेल्या गुप्त बैठकीतील तपशील सांगण्याचा अधिकार मला नाही. मात्र या खुलाशानंतरही मराठा समाजाच्या प्रतिनिधींचे समाधान झाले नाही. वृत्तपत्रातूनच याबाबत खुलासा व्हावा, असा पवित्रा घेत सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी बैठकीतून बाहेर पडले. मराठा समाजाबद्दल आकस ठेवून एक प्रशासकीय अधिकारी, असं बोलणार असेल तर त्या अधिकाèयाला सोडणार नाही. त्या अधिकाèयाच्या छाताडावर उभे राहू, असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिलाय.