Spread the love

मंत्री हसन मुश्रीफ यांना आंदोलन अंकुशची निवेदणाद्वारे मागणी

उसाचा उत्पादन खर्च वाढला त्या प्रमाणात उसाचा हमीभाव केंद्र सरकार ने वाढवला नाही त्यामुळे कारखान्याच्या सरासरी रिकव्हरी नुसार दिली जात असलेली एफ आर पी ही ऊस उत्पादकांची फसवणूक ठरत असून कारखान्याच्या वाढलेल्या उत्पन्नाचा विचार करून एफ आर पी पेक्षा जादा रक्कम शेतकऱ्यांना मिळणे हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे आपल्या कारखान्याने दुसरा हप्ता म्हणून तात्काळ 500 रुपये द्यावेत अशी आंदोलन अंकुश ने मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली.

निवेदनात म्हंटले आहे की ऊस हंगाम 2021/22 मध्ये साखरेला 3100 ते 3200 रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला होता तो गत आर्थिक वर्षात वाढून 3400 ते 3500 रुपये ( करविरहित ) मिळाला आहे. साखर विक्रीच्या वाढलेल्या दरातून क्विंटलला 300 ते 400 रुपये जादा पैसे कारखान्याना मिळालेले आहेत ते पैसे आजरोजी त्यांच्याकडे शिल्लक आहेत ते शेतकऱ्यांना दुसरा हप्ता म्हणून तात्काळ द्यावेत. उसापासून निर्माण होणाऱ्या बग्यास ला 2000 रुपये टन मिळणारा दर गेल्या वर्षी 4000 रुपये मिळाला मळी 5500 रुपये दराने जायची त्याचा दर गेल्या वर्षी 9000 रुपये झाला आहे म्हणजे गेल्या दोन वर्षात बग्यास व मळी यांचे दर दुप्पट झाले त्यामुळे कारखान्याना जादा फायदा मिळालेला आहे त्यातून व साखरेला जादा मिळालेल्या उत्पन्नातून कारखान्याला दुसरा हप्ता 500 रुपये सहज देता येतो.

खते औषधे मशागत मजुरी याचे दर वाढलेमुळे उसाचा उत्पादन खर्च मोठया प्रमाणात वाढला आहे व गेल्या हंगामात उसाचे उत्पादनही प्रति एकर 20 टनाने कमी झाल्याने शेतकरी संपूर्ण तोट्यात गेला आहे व त्याचे पीककर्ज सुद्धा गेल्या वर्षी फिटलेले नाही ऊस उत्पादक शेतकरी कर्जाच्या फेऱ्यात अडकला आहे त्याला यातून वाचवायचे असेल तर त्याला परवडणारा दर कारखान्याना द्यावा लागेल. एकीकडे शेतकरी अडचणीत आहे तर त्याउलट साखर कारखाने साखरेचा वाढलेला दर व उप पदार्थाना मिळत असलेले वाढीव दर यामुळे प्रचंड नफ्यात आलेले आहेत.साखरेला दर नाही म्हणून अनेक वर्ष शेतकऱ्यांना एफ आर पी वर भागवत आलेला आहात पण सध्या साखरेला दर मिळाला आहे आणि कारखान्याकडे त्यातून आलेले पैसे उपलब्ध आहेत त्यामुळे च यावर्षी एफ आर पी च्या वर पैसे शेतकऱ्यांना साखर कारखान्याni द्यायला पाहिजेत अशी मागणी कागल तालुक्यातील साखर कारखान्याकडे आज निवेदणाद्वारे केली आहे.

महत्वाचे

मागणी वर विचार करण्याचे मंत्री मुश्रीफ यांनी आश्वासन दिले असून, कारखाने अडचणी आहेत हे यावर्षी न सांगता दुसरा हप्ता देऊन अडचणीतील शेतकऱ्यांना वाचवा अशी विनंती धनाजी चुडमुंगे यांनी मुश्रीफ यांना केली. यावेळी दीपक पाटील रावसाहेब ऐतवडे दत्तात्रय जगदाळे रशीद मुल्ला आप्पा कदम अतुल खद्रे सुनील जाधव सुनील मोरबाळे हे उपस्थित होते