दहीहंडी म्हटले की आपसूकच शिरोळ हे नांव समोर येतं. आज नागपंचमीच्या मुहुर्तावर नारळ फोडून पथकाने दहीहंडीच्या सरावाला सुरूवात केली आहे.
आज सकाळी 10 वाजता गोडीविहीर तालीम मंडळाने नारळ फोडून सरावाला सुरूवात केली. मंडळाची स्थापना 1986 साली झाली असून हे गोविंदा पथक गेले 20 वर्षापासून दहीहंडी फोडत आहे. आजपर्यंत या मंडळाने लहान मोठ्या दहीहंडी मिळून एकूण 200 ते 250 दहीहंडी फोडले आहेत. मंडळामध्ये 500 गोपाळ आहेत तर मंडळामार्फत सर्वांचा विमा उतरवून सुरक्षितता घेतली जाते अशी माहिती अध्यक्ष संभाजी भोसले यांनी दिली. यावेळी कोल्हापूर जिल्हा भाजपा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, नगरसेवक अरविंद माने, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोळी, मुकुंद गावडे, विजय संकपाळ, मारूती जाधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.