Spread the love

प्रस्ताव सादर करण्याचे प्रधान सचिवांना मुख्यमंत्र्यांचे आदेश : खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश

हातकणंगले/ महान कार्य वृत्तसेवा

राज्य शासनाच्या महापुरुषांच्या यादीत पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाचा लवकरच समावेश होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान सचिव यांना याबाबतचा प्रस्ताव सादर करावा अशी सूचना केली आहे. यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी पाठपुरावा केला आहे.

बहुजन समाजामध्ये स्वावलंबी शिक्षणाचा प्रचार करणारे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे झाला. १०४ वर्षापूर्वी १९१९ मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन कमवा आणि शिका या योजनेद्वारे डॉ. कर्मवीर आण्णा यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्वावलंबी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने शिक्षणाचा पाया रचिला. पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या बहुजन समाजामध्ये स्वावलंबी शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणान्या पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा महाराष्ट्र शासनाच्या महापुरुषांच्या यादीत समावेश करुन त्या कार्याचा येतोच सन्मान करावा अशी मागणी खासदार माने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.