शेतकरी वजन काटा उभारणी कामाला मदतीसाठी तालुक्यात फिरत आहे. आज कुटवाड या गावात आमचे सहकारी सुशील भोसले, नवजीत पाटील यांच्यासह फिरत असताना, अगदी साधे साधे शेतकरी कुटुंब पण दानत इतकी मोठी की शहरांतल्या मोठया बंगले वाल्यांना पण लाजवेल अशी. गेली तीन महिने या काटा उभारणीच्या निमित्ताने फिरताना, एक विलक्षण अनुभव प्रत्येक गावात येत आहे की, शेतकरी आम्हाला अगदी भरभरून दान देत आहे.
मला दररोज हा प्रश्न सतावत आहे की मागच्या 15- 20 वर्षात जे प्रामाणिक काम केले आहे याचे हे फळ आहे की आपन दिवस रात्र राबून पिकवलेल्या उसाच्या वजनातील काटामारी या काट्यामुळे थांबणार या विश्वासामुळे शेतकरी आपलं योगदान देत असेल. कारण काहीही असेल पण, आपल्या कुवतीच्या बाहेर ज्या उस्फुर्तपणे शेतकरी आम्हाला आर्थिक मदत देत आहे ते पाहिल्यास शेतकरी…..खरंच राजा आहे हे दररोज अनुभवायला मिळत आहे.
धनाजी चुडमुंगे
आंदोलन अंकुश संघटना