प्रांत वर विराट मोर्चा निघणार
सिटी रिपोर्टर
इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी व कार्यवाही त्वरीत सुरु झाली पाहिजे. या मागणीसाठी बुधवार दि. २३ रोजी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली आहे आणि सकाळी ठीक १० वाजता प्रांत कार्यालयावर विराट मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. या मोर्चामध्ये इचलकरंजी शहरातील सर्व राजकीय पक्ष प्रमुख व पदाधिकारी, सर्व आजी व माजी नगरसेवक व सहकारी, विविध समाजसेवी संघटना प्रमुख व पदाधिकारी, सर्व महिला संघटना प्रमुख व पदाधिकारी, सर्व कामगार संघटना प्रमुख व पदाधिकारी, सर्व औद्योगिक संघटना प्रमुख व पदाधिकारी, सर्व यंत्रमागधारक संघटना प्रमुख व पदाधिकारी, सर्व व्यापारी संघटना प्रमुख व पदाधिकारी, सर्व व्यावसायिक संघटना प्रमुख व पदाधिकारी, सर्व शैक्षणिक संस्था प्रमुख व पदाधिकारी, सर्व सहकारी संस्था प्रमुख व पदाधिकारी, अन्य विविध संस्था संघटना प्रमुख व पदाधिकारी, सर्व महिला बचत गट सहभागी होणार आहेत.
प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये रविंद्र माने, मदन कारंडे, शशांक बावचकर, अजीतमामा जाधव, सागर चाळके, प्रसाद कुलकर्णी, पुंडलिक जाधव, विकास चौगुले, राहुल खंजीरे, नितीन जांभळे, विठ्ठल चोपडे, कॉ. सुनील बारवाडे, कॉ. सदा मलाबादे, शहाजी भोसले, भाई शिवाजी साळुंखे, भाऊसाहेब आवळे, महादेव गौड, अभिजित पटवा, प्रकाश मोरबाळे, राजू आलासे, रवि रजपुते, कौशिक मराठे, रवि जावळे, सयाजी चव्हाण, ध्रुवती दळवाई, सौ. माधुरी चव्हाण, सुषमा साळुंखे, सौ. रिटा रॉड्रिग्युस, कॉ. हणमंत लोहार, प्रताप पाटील, जाविद मोमीन व अन्य मान्यवर उपस्थित होते.